पौष्टिक आणि चविष्ट नारळाच्या वाटणात शिजवलेली डाळींबी उसळ.
साहित्य :
१ कप ओला नारळ
१/२ कप कोथिंबीर
५-६ लसूण पाकळ्या
४ हिरव्या मिरच्या
२ कप वाल (सोल्लेले आणि मोड आलेले )
१ tsp राई
१/४ tsp हिंग
१/४ tsp हळद
२ tsp गुळ
मीठ चवी पुरता
१ tps लाल तिखट (ऑप्शनल )
२ कप पाणी
कृती:
सर्वात आधी वाटण तयार करून घ्या. मिक्सर मधे ओला नारळ, कोथिंबीर, ५-६ लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या. वाटल्यास थोड़ पाणी घालून वाटा. हे वाटण तयार आहे.
एका कढाई मधे तेल आणि राई घाला. राई तडतडली की त्यात हिंग, हळद आणि नारळाच वाटण घालून चांगले परतून घ्या. खमंग वास सुटल्यावर त्यात वाल घालून परत नीट परतून घ्या. वाल नाजुक असल्यामुळे पटकन मोडले जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
आता वालीत २ कप पाणी घालून मध्यम आचेवर वाल शिजू दया. वाल शिजत आले की त्यात गुळ, मीठ आणि लाल तिखट घाला आणि मंद आचेवर शिजवा. वालाची उसळ/ डाळींबी उसळ तयार आहे.
गरमागरम पोळी, भाकरी बरोबर ही उसळ उत्तम लागते.
No comments:
Post a Comment