Sunday 19 April 2015

वांग्याचे भरीत - Vangyacha Bharit

वांग्याचे भरीत हे विविध प्रकारे घरोघरी केल जात. काही त्यात लसणाची फोडणी घालतात काही कांदा टोमॅटो घालून या वांग्याच्या भरताचा आस्वाद घेतात. मी आज माझ्या घरात केल जाणार एकदम सोप्प पण स्वादिष्ट वांग्याचं भरीत तुमचा सगळ्यान बरोबर शेर करत आहे. 

साहित्य :

१ मोठ वांग
१ मध्यम कांदा , बारीक चिरून
१ tsp लाल तिखट
२ tbsp गोडा मसाला
मीठ चवी साठी
१/२ tsp साखर (चावी साठी )
२ tbsp दाण्याचा कुट

फोडणीसाठी:
२ tbsp तेल
१ tsp मोहरी (राई )
१/४ tsp हळद
१/४ tsp हींग

कृती :

वांग भाजून गार करायला बाजूला ठेऊन द्या .वांग गार झालं की ते सोलून आतील गर बाजूला काढा आणि चमच्या च्या साह्याने गराचे बारीक तुकडे करून घ्या.

आता या वांग्याच्या गरात, लाल तिखट, गोडा मसाला, दाण्याचा कुट, मीठ, साखर घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

फोडणी : एका कढईत तेल घ्या . तेल गरम झालं की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात हळद आणि हींग घालून ही फोडणी वांग्याच्या गरावर घाला आणि मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

भरीत वाढताना त्याचावर बारीक चिरलेला कांदा पसरून घ्या. गरमा गरम भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.

By: Anjali Purandare

No comments:

Post a Comment